लाचखोर पोलिसाने एसीबीच्या अधिकाऱ्यावर झाडली गोळी

सामना ऑनलाईन,अकोला

लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या पोलीस उपनिरीक्षकानेच पळून जाण्याच्या प्रयत्नात सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पायाला गोळी लागून गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे.

पिंजर पोलीस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक असलेले नागलकर हे लाच घेत असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. अधिकाऱ्यांनी सापळा रचून नागलकर यांना रंगेहाथ पकडले. नागलकर यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आपल्या सर्विस रिव्हॉल्वरमधून एक गोळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दिशेने झाडली. यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह लाचखोर उपनिरीक्षक नागलकर याला अटक केली.