न्यायालयीन लिपिकाने उचलले टोकाचे पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई उच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तीकडे लिपीक म्हणून काम करणाऱ्याने राहत्या इमारतीच्या 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच्या मृत्यूप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दोन जणींविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

मृत मुलगा हा वांद्रे पूर्व येथील एका सोसायटीत राहत होता. तो काही काळ मुंबई उच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तीकडे लिपीक म्हणून काम करत होता. गेल्या पाच महिन्यांपासून तो घरातूनच काम करत होता. तो गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. गेल्या आठवडय़ात मृत मुलाच्या मित्राने त्याच्या आईला पह्न करून तो तणावात का आहे याबाबत विचारणा केली. मृत मुलगा बंगळुरू येथे शिक्षणासाठी असताना त्याची एका तरुणीसोबत ओळख झाली.

ती तरुणी त्याला त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात केस दाखल करेन असे सांगत होती. आईशी बोलताना त्याने याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी एका नंबरवरून मुलाच्या आईला मेसेज आला. तेव्हा हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याच्या आईने आणि वाहनचालकाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दरवाजा उघडला नाही. त्यानंतर वाहनचालक हा चावी बनवणाऱयाला आणण्यास गेला. तेव्हा इमारतीखाली प्रचंड गर्दी होती. तो चालक गर्दी पाहण्यासाठी गेला. त्याला पार्ंकगजवळ मुलगा जखमी अवस्थेत पडलेला दिसला. याची माहिती समजताच खेरवाडी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी मुलाला सायन रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.