
प्रसिद्ध बॉडीबिल्डर मनोज पाटील याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अभिनेता साहिल खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी साहिलला अटकपूर्व जामीन मंजूर केला.
साहिल खानने त्रास दिल्याचा आरोप करत मनोज पाटीलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याने ओशिवरा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लेखी पत्रही लिहिले. त्यानुसार साहिलवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अटक होऊ नये म्हणून साहिलने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.



























































