राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडेतेरा लाखांवर; 10,259 नवीन रुग्ण

राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज 14 हजार 238 रुग्ण बरे होऊन घरी परतले. दिवसभरात 10 हजार 259 नवीन रुग्ण आढळले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.65 टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर गेली असून सध्या 1 लाख 85 हजार 270 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात 250 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची आज नोंद झाली असून मृत्यूदर 2.65 टक्के एवढा आहे. 80 लाख 69 हजार 100 नमुन्यांपैकी 15 लाख 86 हजार 321 नमुने पॉझिटिव्ह (19.66 टक्के) आले आहेत. राज्यात 23 लाख 95 हजार 552 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 23 हजार 749 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत एकाच दिवसांत 2988 कोरोनामुक्त; 1791 नवे रुग्ण, 47 मृत्यू
मुंबईत गेल्या 24 तासांत तब्बल 2 हजार 988 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1791 नवे रुग्ण आढळले असून 47 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने एकूण कोरोनामुक्त होणाऱयांचा आकडा 2 लाख 8 हजार 99 वर पोहोचला आहे. नव्या रुग्णांमुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 240339 झाली आहे. यामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सद्यस्थिती मुंबईत फक्त 18 हजार 717 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या