
राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट होत आहे. कोरोनाबाधितांची पाच अंकी संख्या आता चार अंकी झाली आहे. आज दिवसभरात 7 हजार 89 रुग्ण आढळून आले तर त्याच्या दुप्पट 15 हजार 656 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.49 टक्के एवढे झाले आहे. उपचाराखालील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन 2 लाख 12 हजार 439 एवढी झाली आह़े
राज्यात आज 165 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 76 लाख 97 हजार 906 नमुन्यांपैकी 15 लाख 35 हजार 315 नमुने पॉझिटिव्ह (19.94 टक्के) आले आहेत. राज्यात 23 लाख 23 हजार 791 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 25 हजार 951 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत दिवसभरात 1,620 कोरोना रुग्ण; 1,968 कोरोनामुक्त, 36 जणांचा मृत्यू
मुंबईत आज दिवसभरात 1,620 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत एकूण 1,968 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 1 लाख 95,773 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 36 जणांचा मृत्यू झाला.
मुंबईत 36 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 9 हजार 466 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 69 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 22 हजार 693 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 12 लाख 71 हजार 87 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 31 हजार 70 वर पोहोचली आहे.































































