
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
अमेरिकेतेल सिएटल शहरात गुगल कंपनीच्या आवारात बांधकाम सुरू असताना क्रेन कोसळली या दुर्घटनेत चार लोकांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. शनिवारी ही दुर्घटना झाली आहे. गुगलच्या कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी ही क्रेन आणण्यात आली होती.
जेव्हा ही क्रेन कोसळली तेव्हा या क्रेनखाली सहा गाड्या दबल्या गेल्या. या दुर्घटनेत तीन पुरुष आणि एक महिलेचा मृत्यू झला. मृतांपैकी दोन पुरुष हे कामगार होते. तर महिला ही कारमध्ये होती. या दुर्घटनेत एक चार महिन्याची चिमुरडीही जखमी झाली आहे. या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.






























































