सोन्या-चांदीच्या राख्यांची क्रेझ, राजस्थान, महाराष्ट्र, दिल्लीतून मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रक्षाबंधन येत्या 22 ऑगस्ट रोजी आहे. सर्वात आकर्षक राखी भावाच्या हाती बांधता यावी म्हणून बहिणी धडपड करत असतात. बहीण-भावाचे नाते दृढ करणारी राखी ही काळानुरूप बदलली असून सोन्याचांदीच्या राख्यांची व्रेझ दिसत आहे. म्हणूनच शुद्ध सोन्यातील आणि चांदीच्या खास राख्या डिझाईन करण्यात येत आहेत.

राजकोटमधील ज्वेलर्सनी शुद्ध सोन्या-चांदीच्या राख्या बाजारात आणल्या आहेत. 22 कॅरेटमध्ये सोन्याच्या राख्या बनवण्यात आल्या आहेत, असे ज्वेलर सिद्धार्थ साहोलिया यांनी सांगितले. चांदीच्या 50हून अधिक डिझाईन्स आणि सोन्याच्या विभागात 15 डिझाईन्स देत आहोत. सोन्याच्या राखीचे वजन 1 ग्रॅम ते 1.5 ग्रॅम दरम्यान असते. सोन्याच्या राख्यांची किंमत 6 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत आहे. चांदीच्या राख्यांची किंमत 150 ते 550 रुपये असेल. राजस्थानव्यतिरिक्त महाराष्ट्र आणि दिल्ली येथून सुवर्ण राख्यांना मागणी असते. लोकांना नव्या संकल्पनेतील राख्या आवडत आहेत, असे साहोलिया म्हणाले. या राख्या सुंदर लाकडी कोरीव पेटय़ांमध्ये उपलब्ध आहेत. ज्यात ड्रायप्रूट्स, चॉकलेट्स आणि इतर साहित्यदेखील देण्यात आलेले आहे.

सोन्याच्या भाव चढेच असल्यामुळे राखीसाठी मोजलेले पैसे म्हणजे एकप्रकारची गुंतवणूक असते. यातून सण साजरा होतो आणि सोने खरेदीचा आनंदही मिळतो. चांदीच्या राख्यांनाही सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांकडून आधीपासूनच पसंती दिली जाते.