
वर्ल्ड कपमधील दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे दोन्ही घायाळ संघ आपले वर्ल्ड कप अभियान सुरू करताहेत. दोन्ही संघांतील दिग्गज खेळाडू शेवटच्या क्षणी संघातून बाहेर पडल्यामुळे त्यांना आपल्या अन्य खेळाडूंच्या मदतीने खेळावे लागणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांना सलामीच्या सामन्यात सावध खेळावे लागणार आहे.
दक्षिण आफ्रिकेला नॉर्किया आणि मगालाची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवेल. कॅगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, केशव महाराजवर गोलंदाजीची मदार. फलंदाजीत क्विंटन डीकॉक, एडन मार्करम आणि टेम्बा बवुमाचा फॉर्मच त्यांना आव्हानात्मक धावसंख्या गाठून देऊ शकतो.
पात्रता फेरीतून वर्ल्ड कपसाठी आलेल्या श्रीलंकेसाठी पहिली लढत जिंकणे मोठे आव्हान आहे. त्यांची गोलंदाजी महीश तीक्षणा आणि दुनिथ वेल्लालागे या फिरकीवर अवलंबून असेल. तसेच लाहिरू कुमारा, मदुशंका, पथिराणा आणि रजीथा या वेगवान गोलंदाजांना प्रभाव श्रीलंकेला विजयाकडे घेऊन जाऊ शकतो.
अंदाज – श्रीलंकेच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेची कामगिरी जोरदार झालीय. त्यामुळे सलामीच्या लढतीत आफ्रिकन संघ विजयी ठरू शकतो.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डिकॉक, टेम्बा बवुमा (कर्णधार), एडन मार्करम, रॉसी वॅन डर डुसेन, रिझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, मार्को यानसन, गेराल्ड कोएत्झ, लिझाड विलियम्स, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी, कॅगिसो रबाडा.
श्रीलंका – कुसल मेंडिस, कुसल परेरा, पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदिरा समरविक्रमा, दासुन शनाका (कर्णधार), चरिथ असलंका, धनंजया डि’सिल्व्हा, दुशन हेमंथा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका, मथीशा पथिराणा, कसुन रजीथा, महीश तीक्षणा, दुनिथ वेल्लालागे.


























































