क्रिकेटपटूच्या पत्नीचा पाठलाग करून गाडीला धडक दिली, दोन तरुणांविरुद्ध तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमिअर लीग 2023मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नीतिश राणा याची पत्नी साची मारवाह हिच्यासोबत दोन तरुणांनी गैरवर्तन केल्याचं वृत्त आहे. ही घटना दिल्लीच्या कीर्ती नगर येथे घडली असून बाईकवरून आलेल्या या दोघांनी तिच्या गाडीला धडक दिल्याचीही माहिती मिळत आहे.

साची मारवाह हिने आपल्या इन्स्टाग्रामवर या घटनेची माहिती दिली आहे. दिल्ली येथे गाडीतून प्रवास करत असताना दोन तरुणांनी स्कूटरवरून तिच्या गाडीचा पाठलाग केला आणि गाडी न थांबवल्यामुळे थेट गाडीला धडक दिल्याचं साची मारवाह हिचं म्हणणं आहे.

या घटनेनंतर साचीने पोलिसात तक्रार नोंदवली. मात्र, दिल्ली पोलिसांनीही आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सांचीने केला आहे. तक्रार नोंदवण्यास आधी टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तिला घरी सुखरूप पोहोचल्याच्या कारणाने ही घटना विसरून जाण्याचा सल्ला दिला आणि पुढच्या वेळी असा प्रसंग उद्भवल्यास गाडीचा क्रमांक नोंदवण्यास सांगितल्याचा खुलासा साची हिने केला आहे. या प्रकरणी नीतिश राणा याने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.