
शस्त्र तस्करीप्रकरणी एकाला क्राइम ब्रँच युनिट 9ने अटक केली. सचिन सावंत असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल आणि 6 काडतुसे जप्त केली.
वांद्रे पश्चिम परिसरात एक जण शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती युनिट 9चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील, उपनिरीक्षक सुजित म्हैसधुणे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. गुरुवारी सायंकाळी पोलिसांचे पथक वांद्रे पश्चिम येथील एका बार जवळ गेले. तेथे पोलिसांनी सापळा रचून सावंतला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 6 काडतुसे जप्त केली.