सोने खरेदीच्या नावाखाली चोरी करणारी बंटी-बबली जोडी गजाआड 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोने खरेदीच्या नावाखाली हातसफाई करणाऱया बंटी बबलीला क्राईम ब्रँच युनिट 12ने अटक केली. सुचित्रा देवी आणि अंकित अग्निकांत आद्या अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना पुढील तपासासाठी दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

गोरेगाव पूर्व येथील ज्वेलरीच्या दुकानात गेल्या आठवडय़ात एक जोडपे सोने खरेदीसाठी आले. दागिने दाखवतानाच महिलेने अंगठी तिच्या पर्समध्ये ठेवली. त्यानंतर तेथून निघून गेले. दुकानातील अंगठी कमी असल्याचे दुकानातील एका कर्मचाऱयाच्या लक्षात आले. दुकानातील सीसीटीव्हीची तपासणी केली तेव्हा खरेदीसाठी आलेल्या त्या महिलेने ती अंगठी चोरल्याचे लक्षात आले. चोरीप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. याचा समांतर तपास युनिट 12 करत होते.

प्रभारी पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी गोरेगाव परिसरातील सीसीटीव्ही पॅमेऱयाची तपासणी केली. ते दोघे गोरेगाव पूर्व परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून सुचित्रा आणि अंकितला पोलिसांनी ताब्यात घेतले.