
नात्याला काळिमा फासल्याची घटना सांताक्रुझ परिसरात घडली. मामाने चक्क आपल्या भाचीची विक्री केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांना वाकोला पोलिसांनी अटक केली. लतीफ शेख, लॉरेन्स फर्नांडिस, मंगल जाधव, करण सणस आणि वृंदा चव्हाण अशी त्याची नावे आहेत.
तक्रारदार महिला या सांताक्रुझ येथे राहतात. त्याची पाच वर्षांची एक मुलगी आहे. 22 नोव्हेंबरला रात्री ती मुलगी अचानक बेपता झाली. हा प्रकार लक्षात येताच तिने मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुलगी मिळून न आल्याने तिने वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. परिमंडळ-8 चे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम याच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी एपूण सात पथक तयार केली.
तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये पोलिसांना रिक्षाचा नंबर दिसला. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. एक जोडपे हे मुलीला घेऊन जात असलयाचे दिसले. तसेच रिक्षा सोबत मोटारसायकलवरून दोन जण दिसत होते. पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत काही माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लॉरेन्स आणि मंगल जाधवला ताब्यात घेतले. त्या दोघांनी मुलीला करण सणस याना 90 हजार रुपयांना विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांच्या पथकाने पनवेल येथून करणला ताब्यात घेतले. त्याने त्या मुलीला वृंदा चव्हाण आणि अंजली कोरगावकर याना एक लाख 80 हजार रुपयांना विकल्याचे सांगितले. त्या दोघीना ताब्यात घेतले. त्याच्याकडून अपहरण झालेल्या मुलीची सुटका केली.
किरकोळ वादातून तरुणाला भोसकले
किरकोळ वादातून तरुणाच्या पोटात चापू भोसपून पळून गेलेल्या तिघांना वनराई पोलिसांनी अटक केली. नईम धोबी, समीर धोबी आणि विनोदपुमार वडीवेल अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. चापूहल्ल्यात जखमी झालेल्या तरुणावर उपचार सुरू आहेत.
अपहरण करून मुलीला भिक्षा मागण्यास लावले
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला भिक्षा मागण्यास लावल्याचा संतापजनक प्रकार मेघवाडी परिसरात घडला आहे. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी तरुणीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करणाऱ्या तिघांना अटक
सोन्याचे दागिने बघण्याचा बहाणा करून ज्वेलर्सच्या दुकानातून 32 लाखाचे सोने घेऊन पळाल्याप्रकरणी तिघांना निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. श्रावण नाविक, सोनाली यादव आणि फजल परमार अशी त्या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत या गुह्याची उकल करून 32 लाखांचा ऐवज जप्त केला.
महिला मॅनेजरने केला तरुणीचा विनयभंग
ऑफिस कामाच्या नावाखाली तरुणीला घरी बोलावून तिला शीतपेयातून काही द्रव्य देऊन महिला मॅनेजरने दोन जणांसोबत मिळून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मालाड परिसरात राहणारी पिडीत तरूणी अंधेरी येथील एका खासगी पंपनीत काम करते. नोव्हेंबरच्या दुसऱया आठवडय़ात मॅनेजर महिलेने पीडित तरुणीला ऑफिसच्या मीटिंगसाठी एका पॅफेमध्ये बोलावले. पॅफेमध्ये बसून काम करता येणार नाही असे सांगून तिला अंधेरी येथील एका इमारतीत येण्यास सांगितले.दुपारी त्यांनी एकत्र जेवण केले. सायंकाळी तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर ती तिथेच झोपून होती. रात्री तिला जाग आली तेव्हा तिच्या शेजारी एक तरुण झोपल्याचे दिसले. त्या प्रकाराने ती तरुणी प्रचंड घाबरली. त्या फ्लॅटमध्ये मॅनेजर नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्या घटनेनंतर पीडित तरुणी ही रिक्षाने घरी गेली आणि घडल्या प्रकाराची माहिती पुटुंबीयांना दिली. यानंतर तिने अंधेरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मॅनेजरला अटक केली. पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

























































