
संपूर्ण देशात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना राज्यात हे प्रमाण कमी होत आहे. NCRB च्या अहवालात ही बाब समोर आली आहे. गुन्हेगारीत राज्याचा देशात 9 वा क्रमांक लागतो. देशात केरळ, तेलंगाणा, मध्य प्रदेश, हरयाणा आणि राजस्थानच्या तुलनेत राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे.
भारतीय दंड संहिता कायद्याअंतर्वत राज्यात 2019 साली गुन्हेगारीचे प्रमाण घटले आहे. देशात 2017 ते 2019 दरम्यान गुन्हेगारीचे प्रमाण अधिक होते ते राज्यात ते कमी होत होते. देशात 2017 ते 2019 दरम्यान प्रति लाख लोकसंख्या मागे 237.9 केसेस होत्या. 2019 मध्ये त्याचे प्रमाण वाढून प्रतिल लाख 241.2 वर पोहोचले होते. राज्यात 2018 साली प्रतिल लाख 280.62 केसेस होत्यात 2019 पर्यंत त्या कमी होऊन 278.4 वर पोहोचल्या आहेत. राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाणही वाढले आहे, 2017 साली गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण 32.45 टक्के इतके होते, 2018 साली 41.41 तर 2019 साली हे प्रमाण 49 टक्के इतके होते.
2019 साली देशात 4 लाख 17 हजार हिंसक गुन्ह्यांची नोंद झाली त्यात प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश, दुसरा पश्चिम बंगालचा लागतो. यात महाराष्ट्राचा क्रमांक चौथा लागतो. राज्यात 44 हजार 74 हिंसक गुन्ह्यांची नोंद झाली. खूनासंबंधीत गुन्ह्याचा दर देशात 2.2 टक्के इतका आहे. तर राज्यात हे प्रमाण 1.7 टक्के इतके आहे.


























































