
गुह्यांची झटपट उकल व्हावी, फरार, संशयित आरोपी पटकन मिळावा यासाठी पारंपरिक आदानप्रदान पद्धतीऐवजी पोलिसांनी आता ऑनलाइनचा आधार घेतला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकाचवेळी सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयांना आरोपी आणि त्यांची ‘कुंडली’च उपलब्ध होत आहे. शिवाय व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनदेखील आरोपींच्या माहितीची देवाणघेवाण होत असल्याने ते पोलिसांच्या फायद्याचे ठरू लागले आहे.
आरोपी पकडल्यानंतर प्रत्येक प्रादेशिक विभागांतर्गत गुन्हेगार व त्यांच्या माहितीची देवाणघेवाण केली जायची. ती पद्धत वेळखाऊ होती, शिवाय आरोपींना आदानप्रदानच्या ठिकाणी ने-आण करावी लागत होती, पण सहआयुक्त नांगरे-पाटील यांनी या पद्धतीला ऑनलाइनची जोड दिली. एका ठिकाणाहून शहरातील 94 पोलीस ठाण्यांतील अधिकाऱयांना आपल्याकडचा आरोपी आणि त्याची माहिती देण्याची पद्धत त्यांनी सुरू केली.
जुलै महिन्यापासून शहरात ऑनलाइन आदानप्रदान पद्धत राबविली जात आहे. यामुळे वेळीची बचत होत असून आरोपींना ने-आण करण्याची डोकेदुखी होत नाही. शिवाय बसल्याठिकाणी शहरातील सर्व गुन्हेगारांची माहिती व प्रत्यक्ष गुन्हेगार पाहता येत असल्याने गुह्यांची उकल होण्यास त्याची मदत होऊ लागली आहे. या पाच महिन्यांत 738 आरोपींना त्यांच्या गुह्याच्या कुंडलीसह दाखविण्यात आले. तसेच यामुळे 70 गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे या ऑनलाइन आदानप्रदानामध्ये शेजारच्या जिह्यातील पोलिसांनादेखील सहभागी करून घेतले जात आहे. त्यात स्थानिक पोलिसांबरोबर गुन्हे शाखेच्या अधिकाऱयांचादेखील समावेश असतो.
व्हॉट्सअॅपवरदेखील देवाणघेवाण
दर शुक्रवारी व्हीसीवर होणाऱया आदानप्रदानाव्यतिरिक्त शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील प्रकटीकरण अधिकाऱयांचा व्हॉट्सअॅप ग्रुपदेखील बनविण्यात आला आहे. त्यामुळे एखादा गुन्हा उघडकीस आला किंवा आरोपी पकडला की त्याची माहिती लगेच त्या ग्रुपच्या माध्यमातून सांगितली जाते. यामुळे आपल्याकडील फरार अथवा संशयित आरोपी पकडून गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळत आहे.
























































