CWC2019 : न्यूझीलंड फायनलमध्ये दाखल, हिंदुस्थान वर्ल्डकपमधून बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मॅन्चेस्टर

मॅन्चेस्टर येथे रंगलेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये हिंदुस्थानचा पराभव करत न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानचा संघ 221 धावांमध्ये गारद झाला. रवींद्र जाडेजा आणि एम.एस.धोनीने 100 धावांची भागिदारी करत विजयाच्या आशा जागवल्या होत्या. परंतु जाडेजा 77 आणि धोनी 50 धावांवर बाद झाल्यावर टीम इंडियाच्या विजयाच्या आशाही मावळल्या.

तत्पूर्वी मंगळवारी खेळवण्यात आलेल्या न्यूझीलंड विरूद्ध हिंदुस्थान सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अर्धवट राहिला होता. काल पाऊस आला तेव्हा न्यूझीलंडच्या 46.1 षटकात 5 बाद 211 धावा झाल्या होत्या. हा सामना काल जिथे थांबला होता तिथून पुढे सुरू झाला आहे. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने धारधार गोलंदाजी करत न्यूझीलंडचा डाव 8 बाद 239 धावांवर रोखला.

वाचा लाईव्ह अपडेट –

  • हिंदुस्थान वर्ल्डकपमधून बाहेर, न्यूझीलंडचा 18 धावांनी विजय

  • भुवनेश्वर बाद, हिंदुस्थानवर पराभवाचे सावट
  • हिंदुस्थानला आठवा धक्का, धोनी बाद
  • बाद होण्यापूर्वी केली 77 धावांची खेळी
  • रवींद्र जाडेजा बाद
  • हिंदुस्थानच्या 200 धावा पूर्ण
  • जाडेजा-धोनीमध्ये 100 धावांची भागिदारी

  • अखेरच्या 30 चेंडूत 52 धावांची आवश्यकता
  • 3 चौकार आणि 3 षटकारांसह झळकावले अर्धशतक
  • रवींद्र जाडेजाचे अर्धशतक

  • 60 चेंडूत 90 धावांची आवश्यकता
  • 35 षटकानंतर हिंदुस्थानच्या 6 बाद 150 धावा
  • हिंदुस्थानच्या 150 धावा पूर्ण
  • जाडेजा-धोनीमध्ये 50 धावांची भागिदारी

  • 35 षटकानंतर हिंदुस्थानच्या 6 बाद 119 धावा
  • हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण
  • सँटनरच्या गोलंदाजीवर 32 धावा काढून बाद
  • टीम इंडियाला सहावा धक्का, पांड्या बाद

  • 30 षटकानंतर हिंदुस्थानच्या 5 बाद 92 धावा
  • 25 षटकानंतर हिंदुस्थानच्या 5 बाद 77 धावा
  • ऋषभ पंत 32 धावा काढून बाद
  • टीम इंडियाचा निम्मा संघ तंबूत

  • 20 षटकानंतर हिंदुस्थानच्या 4 बाद 70 धावा
  • हिंदुस्थानच्या 50 धावा पूर्ण
  • 15 षटकानंतर हिंदुस्थानच्या 4 बाद 43 धावा
  • दहा षटकानंतर हिंदुस्थानच्या 4 बाद 24 धावा
  • दिनेश कार्तिक 6 धावांवर बाद
  • टीम इंडियाचा डाव कोसळला, चौथा खेळाडू बाद

  • आठ षटकानंतर 3 बाद 13 धावा
  • सहाव्या षटकात हिंदुस्थानचा पहिला चौकार
  • पाच षटकानंतर हिंदुस्थानच्या 3 बाद 6 धावा
  • लोकेश राहुल एका धावेवर बाद
  • हिंदुस्थानची खराब सुरुवात, पाच धावांवर गमावले तीन बळी

  • तीन षटकानंतर दोन बाद 5 धावा
  • ट्रेन्ट बोल्टने केले एका धावेवर बाद
  • हिंदुस्थानची खराब सुरुवात, रोहित-विराट तंबूत

  • मॅट हेन्रीने रोहितला केले बाद
  • हिंदुस्थानला पहिला धक्का, रोहित बाद
  • पहिल्या षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 2 धावा
  • हिंदुस्थानची फलंदाजी सुरू, राहुल-रोहित मैदानात
  • न्यूझीलंडचे हिंदुस्थानपुढे 240 धावांचे आव्हान
  • भुवनेश्वरने मॅट हेन्रीला एका धावेवर केले बाद
  • हिंदुस्थानची धारधार गोलंदाजी, न्यूझीलंडला सलग तीन धक्के
  • जाडेजाने सीमारेषेवर घेतला झेल
  • न्यूझीलंडला सलग दोन धक्के, टेलर-लेथम तंबूत

  • बाद होण्यापूर्वी टेलरने केल्या 74 धावा
  • जाडेजाच्या अप्रतिम थ्रोवर टेलर रनआऊट

  • रॉस टेलर आणि टॉम लेथम मैदानात
  • न्यूझीलंडचा डाव काल थांबला तिथून सुरू