पुणेकरांनो सावधान! सणासुदीत घरफोडी चोरीच्या घटनेत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीचा मुहूर्त साधून फिरायला जात असाल तर सावधान…! कोणीतरी तुमच्या घरावर लक्ष ठेवून आहे. पुण्यात सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एकाच दिवशी तीन घटना समोर आल्या असून प्रवासादरम्यान लुटण्याचे प्रकारही समोर येत आहेत. यामुळे रहिवाशांना जागृत राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

वाकडेवाडी एसटी स्थानक परिसरात चोरट्यांनी प्रवासी तरुणाला धमकावून त्याच्याकडून मोबाइल, रोकड, कागदपत्रे लुटून नेले. याप्रकरणी बीड येथे राहणाNया वैभव वाघ े यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वैभव काल बीडहून एसटीने पुण्यात आला होता. सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी स्थानक परिसरात तो थांबला असताना चोरट्यांनी साडेआठ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. पोलीस उपनिरीक्षक साळवी तपास करत आहेत.

पुणे शहरातील विविध भागात  चोरट्यांनी  तीन ठिकाणी घरफोडी केली. पौड रस्ता, कोंढवा भागातील घरातून चोरट्यांनी तीन लाखांचा ऐवज लांबविला. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी पाहून चोरट्यांनी पौड रस्त्यावर एका सोसायटीतील महिलेची रोकड आािण् दागिने मिळून २ लाख ४८ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी  महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वयंपाकघरातील उघड्या  खिडकीतून घरात शिरुन चोरट्यांनी ४७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविला.  ही घटना कोंढव्यातील भागोदयनगर परिसरात एका सोसायटीत घडली. याप्रकरणी महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे तपास करत आहेत

सराईत चोर झुरळ्याच्या मुसक्या आवळल्या

भवानी पेठेतील मिठाईचे दुकान फोडून 48 हजारांची रोकड चोरणाऱ्या सराईत झुरळ्याच्या मुसक्या आवळण्यात समर्थ पोलिसांना यश आले आहे. आकाश उर्पâ झुरळ्या पाटोळे तडीपारीचा भंग करून तो शहरात दाखल झाला होता. त्याने सकाळी सहा वाजता भवानी पेठेतील मंगलम ड्रायफूट दुकानाचे शटर उचकटून रोख 48 हजार व मिठाई चोरली होती. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर समर्थ पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्याला जेरबंद केले. त्याच्याकडून 46 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, नीलेश साबळे, सुमीत खुट्टे, संतोष काळे, हेमंत पेरणे, दत्ता सोनवणे, सुशील लोणकर यांच्या पथकाने केली.