Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा 21 डिसेंबरचे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Tuesday, December 21, 2021)
मनपसंत खरेदी होण्याची शक्यता आहे. लोकांना मदत कराल. आपल्या परिचयातील काही सज्जनांच्या सहवासाने मन प्रसन्न होईल. सायंकाळी मेजवानीचा आनंद घ्याल.
शुभरंग – पांढरा

वृषभ (TAURUS – Tuesday, December 21, 2021)
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळा. इतरांबद्दल प्रतिक्रिया देताना सावधगिरी बाळगा. पूर्वी घेतलेली उधारी वेळेत देण्याचा प्रयत्न करा. मानसिक शांततेकरिता ध्यानधारणा, धार्मिक पुस्तकांचे वचन करा.
शुभरंग – पिवळा

मिथुन (GEMINI – Tuesday, December 21, 2021)
आजचा दिवस आपल्याकरिता लाभदायक आहे. दिवसाच्या सुरुवातीला चांगली बातमी कानी येईल. प्रिय व्यक्तिंची भेट होईल. त्यांचा सहवास लाभेल. अनपेक्षितपणे छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराबरोबर वेळ घालवाल.
शुभरंग – हिरवा

कर्क (CANCER – Tuesday, December 21, 2021)
आपले महत्त्व वाढवणाऱ्या घटना घडण्याची शक्यता आहे. आपल्या हातून सामाजिक कार्य घडेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी दिनचर्या आणि ऋतुचर्येचे पालन करा.
शुभरंग – निळा

सिंह (LEO – Tuesday, December 21, 2021)
मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. जिथे जाल तिथल्या नियमांचे पालन अवश्य करा, नाहीतर नाहक भुर्दंडाला बळी पडावे लागेल. हातून चूक होण्यापूर्वीच सावध राहा. नंतर मनस्ताप करण्याची वेळ येणार नाही.
शुभरंग – पोपटी

कन्या (VIRGO – Tuesday, December 21, 2021)
आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मनाविरुद्ध घटना घडू शकतात. कोणताही निर्णय घेताना दोन्ही बाजू समजून घ्या. दररोज प्राणायम करा. दिवस उत्साहात जाईल. शारीरिक त्रास दूर व्हायला मदत होईल.
शुभरंग – मोरपिसी

तुळ (LIBRA – Tuesday, December 21, 2021)
गृहसौख्य लाभेल. प्रलंबित राहिलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. कामांचे नियोजन करा. वेळेत कामे पूर्ण होतील. स्वत:साठी वेळ द्याल.
शुभरंग – मोती

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, December 21, 2021)
थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. सामाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. लोकं तुमचे मत विचारात घेतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
शुभरंग- राखाडी

धनु (SAGITTARIUS – Tuesday, December 21, 2021)
अतिसाहस करू नका. काही प्रसंगात मनाचा संयम बाळगावा लागेल. मानापानाच्या प्रसंगाना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामांचे नियोजन केल्यास कामे वेळेवर पूर्ण होतील.
शुभरंग – काळा

मकर ( CAPRICORN- Tuesday, December 21, 2021)
कोणाशीही वादविवाद घालण्यात वेळ वाया घालवू नका. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांना समजून घ्यावे लागेल. घरातील ज्येष्ठांची सेवा करा. त्यांना वेळ द्या.
शुभरंग – खाकी

कुंभ (AQUARIUS – Tuesday, December 21, 2021)
कलागुणांना वाव मिळेल. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतील. घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यात वेळ जाईल. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण कराल.
शुभरंग- चॉकलेटी

मीन (PISCES – Tuesday, December 21, 2021)
पैसे खर्च करताना काळजी घ्यावी लागेल. बोलण्यावर ताबा ठेवा, बरेचसे प्रश्न सुटतील. मनाविरुद्ध घटना घडल्या तरी त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळाले, याचा विचार करा. त्यामुळे त्रास होणार नाही.
शुभरंग- चंदेरी