Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘10 डिसेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Saturday, December 10, 2022)
मिळालेली संधी वाया घालवू नका. नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. कोणालाही जामिन राहू नका. आरोग्य जपा. गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे टाळा. अभ्यासाकडे लक्ष द्याल. वाचन वाढवावे लागेल. घरी अनपेक्षित पाहुणे येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : काळा

वृषभ (TAURUS – Saturday, December 10, 2022)
कोणाच्याही अनावश्यक बोलण्याकडे लक्ष देऊ नका. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदाराशी वादविवाद टाळा. कोणावरही अपेक्षांचे ओझे ठेवू नका. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. मोगऱ्याचे झाड घरातील अंगणात लावून त्याची निगा राखा.
शुभरंग : आकाशी

मिथुन (GEMINI – Saturday, December 10, 2022)
घरात आनंदी वातावरण निर्माण करा. चुकीच्या गोष्टींना आळा घाला. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे ठरेल. जास्त धावपळ करू नका. आरोग्यासाठी विश्रांती घेणे आवश्यक ठरेल. प्रिय व्यक्तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न कराल. वडीलधाऱ्या मंडळींकडे लक्ष द्या. गोड बोलून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न कराल.
शुभरंग : आकाशी

कर्क (CANCER – Saturday, December 10, 2022)
इच्छाशक्ती दांडगी ठेवा. नवीन नातेसंबंध जोडाल. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. घरातील प्रश्न एकमेकांच्या सहकार्याने सोडवा. आवडत्या व्यक्तिच्या कामाचे कौतुक कराल. जोडीदाराला भेटवस्तू द्या.
शुभरंग : पोपटी

सिंह (LEO – Saturday, December 10, 2022)
तुम्हाला आनंद होईल अशा घटना घडतील. घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन घ्याल. सकाळी लवकर उठून चालण्याचा व्यायाम करा. प्रेमाच्या माणसांशी तुटक वागू नका. जोडीदाराकडून कोणत्याही खासगी गोष्टी लपवू नका. मित्रांपासून सावध राहा.
शुभरंग : पोपटी

कन्या (VIRGO – Saturday, December 10, 2022)
आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कोणालाही नको ती आश्वासने देऊ नका. अति बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मनातील नाराजी काही वेळा व्यक्त न केलेलीच बरी असते. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आत्मविश्वास वाढवा.
शुभरंग : पांढरा

तूळ (TULA- Saturday, December 10, 2022)
तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. अडचणींतून मार्ग सापडेल. व्यवसायातील निर्णय शांतपणे घ्या. नव्या संकल्पना सुचण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन बदलांना सामोरे जावे लागेल. कुटुंबासाठी वेळा काढा. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या.
शुभरंग : बदामी

वृश्चिक ( SCORPIO – Saturday, December 10, 2022)
आर्थिक व्यवहारात गुप्तता ठेवा. बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा. स्वत:च्या छंदाकडे लक्ष द्या. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. प्रेमसंबंधात सावधानता बाळगा. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. आवडत्या ठिकाणी फिरायला जाण्याचे नियोजन कराल.
शुभरंग : लाल

धनु (SAGITTARIUS – Saturday, December 10, 2022)
आपले ते खरे करू नये. भावनेच्या भरात नको ती चूक करू नका. अनावश्यक वस्तूंची खरेदी करू नका. जुनी येणी वसूल होतील. प्रयत्न अर्धवट सोडू नका. नोकरी करणाऱ्या व्यक्तिंच्या अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. देवीमहात्म्य वाचा.
शुभरंग : पांढरा

मकर ( CAPRICORN – Saturday, December 10, 2022)
दुर्गासप्तशतीचा पाठ करा. दिलेला शब्द पाळा. सुविचारी मित्रांशी नाते जोडा. कुटुंबियांना विश्वासात घ्याल. टोकाची भूमिका घेऊ नका. कुटुंबातील व्यक्तिच्या मनाचा विचार करा. अचानक स्वभाव बदलण्याचे कारण शोधून काढा. प्रलोभनांपासून सावध राहा.
शुभरंग : मोरपिसी

कुंभ (AQUARIUS – Saturday, December 10, 2022)
ऐकीव बातमीवर विश्वास ठेवू नका. अतिघाई करू नका. कामाचा व्याप वाढून नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडण्याची शक्यता आहे. कामे योग्य वेळेत पूर्ण करा. नोकरी-व्यवसायात येणारा काळ लाभदायक ठरेल. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. तीर्थयात्रा करण्याची इच्छा होऊ शकते.
शुभरंग : चंदेरी

मीन (PISCES – Saturday, December 10, 2022)
तडजोड करावी लागेल. आज एखादी चांगली बातमी कानी येण्याची शक्यता आहे. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. एकमेकांसाठी वेळ काढाल. घरातील लहान मुलांकडे लक्ष द्यावे लागेल.
शुभरंग : नारिंगी