Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा 28 एप्रिलचे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Thursday, April 28, 2022)
सर्वांकडून मदतीचा हात मिळेल. सावधानता बाळगा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गोड आश्वासने देणाऱ्यांपासून सावध राहा. उगाच कोणतीही शंका मनात बाळगू नका.
शुभरंग : पिवळा

वृषभ (TAURUS – Thursday, April 28, 2022)
कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम रितीने पार पाडाल. सकारात्मक विचार कराल. पैशाची बचत करा. कामात सतर्क राहाल. अडचणींना सामोरे जावे लागेल. स्वत:च्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्याकडे लक्ष द्याल. मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.
शुभरंग : नारंगी

मिथुन (GEMINI – Thursday, April 28, 2022)
विचार कृतीत आणण्यासाठी प्रयत्न कराल. कामात झालेला बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा. स्वत:चे निर्णय स्वत:च घ्यावे लागतील. अडचणींवर मात कराल. जीवलग व्यक्तिंवर अपेक्षांचं ओझं ठेवू नका. प्रिय व्यक्तिच्या कामाचे कौतुक करा.
शुभरंग : आकाशी

कर्क (CANCER – Thursday, April 28, 2022)
घरातील इतर सदस्यांच्या मतास प्राधान्य द्या. जोडीदारांच्या मतांचा विचार कराल. कागदपत्रे वाचल्याशिवाय सही करू नका. ज्येष्ठांच्या सल्ल्याची आवश्यकता भासू शकते. कुटुंबातील वातावरण आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न कराल.
शुभरंग : गुलाबी

सिंह (LEO – Thursday, April 28, 2022)
आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश कराल. सदैव हसतमुख राहाल. कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणी करावी लागेल. सकाळचा वेळ बागकामात घालवा.
शुभरंग: मोरपिसी

कन्या (VIRGO – Thursday, April 28, 2022)
बोलताना दुसऱ्याच्या मनाला त्रास होईल, असे बोलू नका. घरातील वाद घरातच सोडवावे लागतील. नवे मैत्रीचे संबंध निर्माण होतील. प्रलोभनांपासून दूर राहा. कृतीला प्राधान्य द्या. आजचा दिवस लाभदायक आहे.
शुभरंग : खाकी

तूळ (TULA- Thursday, April 28, 2022)
संयम ठेवा. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पैशाचे मोठे व्यवहार तज्ञांच्या सल्ल्याने कराल. जोडीदारासोबत आजची सायंकाळ मजेत घालवाल. बचत करण्याकडे कल वाढवाल. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा, योगासने, सूर्योपासना यांचा आधार घ्या. दररोज व्यायामाकरिता वेळ राखून ठेवा.
शुभरंग : राखाडी

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, April 28, 2022)
रागावर नियंत्रण ठेवा. घरातील माणसांची मने जपाल. भावंडांशी होणारे वादविवाद टाळा. गोड बोलून कामे साधून घेण्याची कला शिका हे आपल्या हिताचे आहे. जोडीदारासोबत प्रेमाने वागा. तुमच्या कामाची सर्वत्र स्तुती होईल. नवी जबाबदारी पेलावी लागेल.
शुभरंग : मोती

धनु (SAGITTARIUS -Thursday, April 28, 2022)
सामाजिक कार्यात भाग घ्याल. अति मसालेदार आणि तेलकट पदार्थ वर्ज्य करा. मनातील विचारांवर देवाच्या नामाने विजय मिळवू शकाल. कोणावरही अतिरिक्त विश्वास ठेवू नका. वादाचे प्रसंग टाळा. आवडत्या कामात मन गुंतवाल.
शुभरंग : चंदेरी

मकर ( CAPRICORN – Thursday, April 28, 2022)
समाजात मान वाढवणारे प्रसंग घडतील. घरातील नको असलेले, तुटलेले सामान घराबाहेर काढा. अति जास्त काळजी करू नका. मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रयत्न कराल. कोणाविषयीही गैरसमज करून घेऊ नका. प्रिय व्यक्तिला समजून घ्याल. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. तांब्याची अंगठी बोटात घाला.
शुभरंग : पांढरा

कुंभ (AQUARIUS – Thursday, April 28, 2022)
आध्यात्मिक कार्यात मन रमवाल. कामात थोरामोठ्यांची मदत घ्याल. दुसऱ्यांच्या आश्वासनांवर अवलंबून राहू नका. आरोग्याची काळजी घ्याल. वाचन आणि लेखन यावर मेहनत घ्याल. घराच्या अंगणात रातराणीचे झाड लावा.
शुभरंग : लाल

मीन (PISCES – Thursday, April 28, 2022)
नातेवाईकांच्या मदतीने आपली कामे पूर्ण करून घ्याल. भूतकाळाचा विचार करू नका. मित्रांपासून सावध राहा. मनाची चंचलता दूर करण्यासाठी गणपती अथर्वशीर्ष वाचा. सकाळच्या कोवळ्या उन्हात चालण्यास किंवा व्यायाम करण्यास वेळ द्याल. मनाजोगी खरेदी करू शकाल. नको ते धाडस करायला जाऊ नका.
शुभरंग : सोनेरी