
मेष -( ARIES – Wednesday, December 1, 2021)
प्रिय व्यक्तिला मौल्यवान भेटवस्तू द्या. अनोळखी लोकांवर अतिविश्वास ठेवू नका. जवळच्या व्यक्तिने दिलेला सल्ला चुकीचा की बरोबर त्याची शहानिशा करूनच पुढे जा. एखाद्याचे कटू बोल मनाला लावून घेऊ नका.
भाग्य रंग – निळा
वृषभ – (TAURUS – Wednesday, December 1, 2021)
घराबाहेर अन्नपदार्थ खाताना काळजी घ्या. निष्काळजीपणा टाळा. माशांना पीठ खाऊ घाला. शेजाऱ्यांना उधार देण्याची वेळ येऊ शकते. सायंकाळचा वेळ कुटुंबियांसोबत घालवा.
भाग्य रंग – काळा
मिथुन – ( GEMINI Wednesday, December 1, 2021)
मित्रांसोबत वेळ घालवाल. ज्यांचा आज पगार झाला नाही त्यांची चिडचिड होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस मानसिक शांततेत जाईल. मिळालेल्या रिकाम्या वेळेत कोणती कामे करायची याचे नियजोन करा.
भाग्य रंग – राखाडी
कर्क – (CANCER Wednesday, December 1, 2021)
आरोग्याची काळजी घ्या. लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित होईल. आज आपल्याला मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग कराल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीकारत घटना घडण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल.
भाग्य रंग – मोती
सिंह – ( LEO Wednesday, December 1, 2021)
म्युच्युअल फंडातली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. स्वत:ची कार्यक्षमात वाढवण्यासाठी संधी मिळेल. दिवसाची सुरुवात समाधानकारक होईल. घरातील बिघडलेल्या वस्तू वेळीच दुरुस्त करून घ्या. खर्च काटकसरीने करावा लागेल.
भाग्य रंग – मोरपिसी
कन्या (VIRGO Wednesday, December 1, 2021)
आर्थिक अडचणी दूर होतील. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुमच्यातील कौशल्याची प्रशंसा होईल. रिकामा वेळ योग्य कामासाठीच खर्च करा. जोडीदाराला वेळ द्याल.
भाग्य रंग – जांभळा
तूळ ( LIBRA Wednesday, December 1, 2021)
आरामाकरिताही वेळ राखून ठेवा. प्रिय व्यक्तिच्या कटू बोलण्याने नाराज होऊ नका. नवीन ओळखी होतील. नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकांचं वाचन करा, नवे संगीत ऐका. वेळ आनंदात जाईल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल.
भाग्य रंग – आकाशी
वृश्चिक ( SCORPIO Wednesday, December 1, 2021)
अतिकामामुळे दिवस व्यस्त जाण्याची शक्यता आहे. कोणाकडूनही फार अपेक्षा ठेवू नका. स्वत:चे आत्मपरीक्षण करा. दूरच्या प्रवासाचे नियोजन करा. थकवा दूर होईल.
भाग्य रंग – पिवळा
धनू ( SAGITTARIUS Wednesday, December 1, 2021)
लहान मुलांना चॉकलेट, मिठाई असे गोड पदार्थ वाटा. तुमच्यातील कलेची प्रशंसा होऊन वाव मिळेल. स्वत:च्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. या वस्तू हरवणार नाहीत अशा ठिकाणी ठेवा.
भाग्य रंग – लाल
मकर ( CAPRICORN Wednesday, December 1, 2021)
घरातील ज्येष्ठांसोबत वेळ घालवाल. तुम्ही पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक आज होईल. जोडीदारासोबत प्रवास, खाणेपिणे किंवा सिनेमा पाहणे यामध्ये वेळ घालवाल. दिवस मजेत जाईल. आजी-आजोबांचा दिवस नातवंडांसोबत आनंदात जाईल.
भाग्य रंग – हिरवा
कुंभ राशी भविष्य (AQUARIUS Wednesday, December 1, 2021)
चांदीची अंगठी बोटात घालण्याची इच्छा होईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्या. देवाप्रती कृतज्ञ राहा. घरी पै-पाहुणे येण्याची शक्यता आहे. त्यांचे आदरातिथ्य करण्यात वेळ निघून जाईल.
भाग्य रंग – खाकी
मीन (PISCES Wednesday, December 1, 2021)
तांब्याच्या भांड्यातले पाणी प्या. रात्रीचे जेवण फार उशिरा जेवू नका. कोणाबाबतही पूर्वग्रहदूषित राहू नका. मिळालेल्या चांगल्या संधीचा फायदा घ्या. आज हाती घेतलेल्या कोणत्याही कामास यशच मिळेल.
भाग्य रंग – केशरी




























































