
सामना ऑनलाईन| मुंबई
हसणे, रडणे, चिडवणे, प्रेम व्यक्त करणे, वैतागणे अशा सर्व मानवी भावभावना दाखवण्यासाठी सोशल मीडियावर इमोजींचा वापर केला जातो. फेसबुक, व्हॉटस्ऍप, इन्स्टाग्रॅम अशा सर्वच ऍपमध्ये इमोजी जास्तीत जास्त वापरले जातात. फेसबुकवर तर दिवसाला सहा कोटी इमोजींचा वापर होतो, अशी माहिती इमोजी डेनिमित्ताने उघड झाली आहे. १७ जुलै हा वर्ल्ड इमोजी डे आहे. फेसबुक मेसेजरवर पाच अरब इमोजींचा वापर केला जातो. इमोजींचा जन्म १९९० मध्ये झाला. तेव्हा त्यास इमोशन्स आयकॉन असे म्हटले जायचे. पूर्वी इमोजीला जपानी एक्सप्रेस असेही म्हटले जायचे. टेक्सच्या जागी त्यांचा वापर केला जायचा. २०१४ सालापासून १७ जुलै हा वर्ल्ड इमोजी डे साजरा केला जातोय.



























































