तरुणाईला दांडिया शिकवण्यासाठी

आदिमायेच्या आगमनाचे वेध लागले आहेत आणि तरुणाईला दांडियाचे. सगळ्यांनाच दांडियाचा पदन्यास जमतोच असे नाही. यासाठी दांडियाच्या अनेक कार्यशाळा सज्ज झाल्या आहेत. तरुणाईला दांडिया शिकवण्यासाठी…

प्राथमिक गरबा शिकता येईल

अनेकांना गरबा खेळण्याची इच्छा असते पण त्यांना खेळता येत नाही. अशा हौशी गरबाप्रेमींसाठी विलेपार्ले वूमन्स नेटवर्कने 7 ऑक्टोबर रोजी गरबा कार्यशाळा भरवली आहे. गरबा प्रेमींना प्राथमिक गरबा येथे शिकता येणार आहे. त्यासाठी कोरिओग्राफर करिश्मा सावंत या गरबा शिकवणार आहेत. कुठलाही वयोगट या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतो. त्यामुळे लहानमुलांपासून आजीआजोबाही या कार्यशाळेत सहभाग घेणार आहेत. सहज साधा-सोप्या गरबा स्टेप्स शिकता येणार आहेत. पण गरबा खेळताना कपड्यांचा अडथळा येऊ नये यासाठी ड्रेसकोड ठेवण्यात आला. महिलांसाठी स्कर्ट, घागरा आणि अनारकली ड्रेस तर पुरुषांसाठी कुर्ता, पारंपारिक वेशभूषा ठेवण्यात आली आहे. ही कार्यशाळा विलेपार्ले पूर्व येथील सुभाष रोप अर्पिता स्टेपअप सायंकाळी 6 ते 8 या वेळेत होणार आहे. अधिक माहितीसाठी जुई बाग- 9833500285, रसिका जोशी- 9869615857 या क्रमांकावर संपर्क साधावा.

रसिका जोशी, विलेपार्ले वूमन्स नेटवर्क  

हौशी गरबाप्रेमींसाठी

गरबा नाइट्सचे आकर्षण सर्वांमध्ये वाढत आहे. यंदा नव्या शैलीतील गरबा प्रकार खेळण्याची इच्छा असलेल्या तरुणाईला आमच्या स्टुडिओने नवे व्यासपीठ दिले आहे. या कार्यशाळेत दोन टाळ्या, तीन टाळ्या, कपल गरबा, पोपट, दोधया अशा गरब्याच्या विविध स्टाईल गरबाप्रेमींना शिकता येणार आहे. त्यांची ही कार्यशाळा 6 आणि 7 ऑक्टोबर अशी दोन दिवस सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत नवी मुंबई आणि ठाणे येथे होणार आहे.  विशेष म्हणजे ही कार्यशाळा विनामूल्य असल्याने अनेकांना या संधीचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी 9920148325वर संपर्क साधावा.

अजय चव्हाण,  स्टेप ऍण्ड स्टाईल डान्स स्टुडिओ

 

नव्या शैली शिकण्याची संधी

नवरात्रात गरबा खेळण्याचा मोह प्रत्येकालाच… शहरात अनेक ठिकाणी होणार्‍या गरबा रास कार्यक्रमात प्रत्येकजण उत्साहात सहभागी होतो. हा उत्साह यंदा अधिक वाढकिण्यासाठी आम्ही गरबा कार्यशाळा आयोजित केली आहे. आमच्याकडे कंटेम्परी डान्स शिकवला जातो पण विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर यंदा पहिल्यांदा गरबा कार्यशाळा आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या कार्यशाळेत फोक स्पेशलिस्ट असलेला आमचा विद्यार्थी गरबा शिकवणार आहे. या कार्यशाळेत पारंपरिक गरबा प्रकारापासून नव्या शैलीतील वेस्टर्न गरबा प्रकार शिकविण्यात येणार आहे. ही कार्यशाळा  6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी दादर पश्चिम येथील एसएनडीए स्टुडिओत सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत रंगणार आहे. अधिक माहितीसाठी 022-24366777 या क्रमांकावर संपर्क साधावा.

श्रद्धा रुपवते, सुमित नागदेव डान्स आर्ट

आपली प्रतिक्रिया द्या