भयंकर! तालिबान्यांनी दानिशला आधी गोळ्या घातल्या नंतर डोक्यावरून गाडी घातली

अफगाणिस्तानमध्ये हिंदुस्थानी पत्रकार दानिश सिद्धीकीची 16 जुलै रोजी तालिबानी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. आता या हत्येबाबत आणखी एक भयंकर माहिती समोर आली आहे. दानिश यांना गोळ्या घालून त्यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या डोक्यावर तालिबान्यांनी गाडी घालण्यात आली.

अफगाणी कमांडर बिलाल अहमद यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत दानिशच्या हत्येचे भयंकर सत्य सांगितले आहे. तालिबान्यांनी दानिशला अत्यंत निर्दयीपणे मारल्याचे या कमांडरने सांगितले आहे. दानिश हा हिंदुस्थानी होता व तालिबानींमध्ये हिंदुस्थानबाबत मोठ्या प्रमाणात रोष आहे. त्यामुळे दानिश त्यांच्या हाताला लागल्यानंतर त्यांनी त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

दानिश सिद्धीकी हे रॉयटर्सचे हिंदुस्थानातील मुख्य छायाचित्रकार होते. अफगाणमधील रक्तरंजित संघर्ष पुन्हा भडकला आहे. या पार्श्वभूमीवर वृत्तांकन करण्यासाठी दानिश सिद्धीकी अफगाणिस्तानात गेले होते. अफगाण लष्कराच्या तुकडीसोबत कंदहारमधील पाकिस्तान सीमे लगत असलेल्या स्पिक बोल्डक परिसरात फोटो काढण्यासाठी गेले होते. यावेळी तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. लष्कर आणि तालिबान्यांमध्ये चकमक झडली. तालिबान्यांनी रॉकेट लाँचरने केलेल्या हल्ल्यात दानिश सिद्धीकी यांचा मृत्यू झाला होता, असे सुरुवातीला सांगण्यात आले. त्यानंतर दानिश यांच्या डेथ सर्टिफिकेटमध्ये त्यांचा मृत्यू गोळ्या लागून झाल्याचे म्हटले आहे.

तालिबानने जबाबदारी नाकारली

तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद म्हणाला की, हिंदुस्थानी पत्रकार दानिश सिद्धिकीच्या मृत्यूप्रकरणी आम्हाला खेद आहे. आम्हाला कुठलीही माहिती न देता अनेक पत्रकार युद्धभुमीवर वार्तांकन करत आहेत. सिद्धिकीच्या मृत्यूला आम्ही जबाबदार नसून पत्रकारांनी युध्दभुमीवर येण्यापूर्वी आम्हाला सूचना द्यावी आम्ही तशी खबदारी घेऊ असेही मुजाहिदने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या