साई रिसॉर्ट प्रकरण : दापोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना इडीने ताब्यात घेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्ट प्रकरणी दोषारोप ठेवण्यात आलेले दापोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना इडी कार्यालयाकडून ताब्यात घेण्यात आले आहे त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

साई रिसॉर्ट प्रकरणी यापूर्वीच उद्योजक सदानंद कदम न्यायालयीन कोठडीत असतानाच तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना इ डी ने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे वादग्रस्त साई रिसॉर्ट पुन्हा चर्चेत आले आहे. हॉटेल चे मालक सदानंद कदम यांना ईडी ने यापूर्वी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते त्यानंतर त्यांना अटकही झाली आहे न्यायालयात हजर केले असता 15 मार्चपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते