
दापोली तालुक्यातील हर्णे बाजारपेठेत छापा टाकून पोलिसांनी 1 लाख 40 हजार 341 रूपयांचा पानमसाला आणि गुटखा जप्त केला आहे. आणखी एका कारवाईत पोलिसांनी दोन बंदुका जप्त केल्या आहे.
अरमान आरिफ अकबाणी वय 26 याने हा पानमसाला आणि गुटख्याचा साठा करून ठेवला होता.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला माहिती मिळताच त्यांनी छापा मारून गुटखा जप्त केला आहे.
दापोली तालुक्यात पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. खेर्डी पानवाडी येथे रहाणारा विनेश बिर्जे वय 40 हा घराशेजारी बंदुकीची साफसफाई करताना आढळला.त्याच्याकडील 50 हजार रूपयांच्या दोन अवैध बंदुका पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दोन्ही कारवाया संदीप वांगणेकर,मिलिंद कदम,विजय आंबेकर,बाळू पालकर आणि दत्ताराम कांबळे यांनी केली.






























































