प्रेमात अडथळा, मुलीने चिरला बापाचा गळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। जबलपुर

प्रेमसंबंधात अडथळा बनत असल्याने एका अल्पवयीन मुलीने (१७) वडीलांची कुऱ्हाडीने वार करून निघृण हत्या केल्याची भयंकर घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. मुलीला व तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे.

जबलपुर येथील बेलखेडा क्षेत्रातील मैली गावात राहणाऱ्या या मुलीचे व शेताची राखण कऱणाऱ्या तरुणाचे प्रेमसंबंध होते. वडीलांना याची भनक लागली होती. त्यामुळे त्यांनी मुलीला तरुणास भेटण्यास मनाई केली होती. पण तरुणाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीला याची काही पर्वा नव्हती. त्यातच तरुण तिला आाई वडीलांनी जेवणात गुंगीचे औषध देऊन भेटायला येत जा असे सांगायचा. यामुळे ती घऱच्यांना चोरुन तरुणाला भेटायला जायची.

शुक्रवारीही ती तरुणाला गावाबाहेर भेटली. तेव्हा त्याने तिला भेट म्हणून महागडा मोबाईल दिला. मुलीच्या हातात एवढा महागडा मोबाईल बघून तिच्या वडीलांना संशय आला व त्यांनी तिला याबद्दल विचारणा केली. यावरुन मुलीचे वडीलांबरोबर कडाक्याचे भांडण झाले. यामुळे संतप्त झालेल्या मुलीने तरुणाला याबद्दल सांगितले. त्यानंतर मुलीने व तरुणाने वडीलांचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. रात्री उशीरा सगळे झोपले असताना तरुणाने मुलीला कुऱ्हाड आणून दिली. त्यानंतर मुलीने घरातील लाईट घालवले. आई. वडील, व भावंडे गाढ झोपल्याची तिने खात्री केली. त्यानंतर गाढ झोपेत असलेल्या वडीलांच्या मानेवरच तिने सपासप वार केले. यात वडीलांचा जागीच मृत्यू झाला. वडीलांना रक्ताच्या थारोळ्यात तसेच सोडून मुलगी प्रियकर तरुणासह घरातून पळून गेली. त्याचवेळी आईला अचानक जाग आली व घरात अंधार झाल्याचे बघून तिला आश्चर्य वाटले. तिने पतीला आवाज तिला. पण प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे ते गाढ झोपले असावे असे तिला वाटले. मेणबत्ती घेण्यासाठी ती किचनमध्ये गेली तेव्हा तिला संशय आला. मेणबत्ती लावताच त्याच्या उजेडात तिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पती दिसला. तिने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो मृत झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने शेजाऱ्यांना बोलावले. शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. चौकशीत आईने मुलीवर संशय व्यक्त केला. त्यानंतर मुलीला व तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली.