मालदीवमध्ये राडा, क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर आणि मायकल स्लेटर यांच्यात बाचाबाची

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि क्रिकेट समालोचक मायकल स्लेटर यांच्यात मालदीवमध्ये राडा झाल्याचे वृत्त आहे. नशेत दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि नंतर हे भांडण शिवीगाळपर्यंत पोहोचले. ‘डेली टेलीग्राफ’ने याबाबत वृत्त दिले आहे.

इंडियन प्रीमिअर लीगचा 14 वा हंगाम स्थगित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू गेल्या काही दिवसांपासून मालदीवच्या ‘ताज कोरल रिसॉर्ट’मध्ये थांबले आहेत. येथूनच ते मायदेशी रवाना होतील. याच रिसॉर्टमध्ये डेव्हिड वॉर्नर आणि क्रिकेट समालोचक मायकल स्लेटर यांच्यात शनिवारी रात्री वाद झाला.

…म्हणून फॉर्मात असूनही पृथ्वी शॉची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड नाही, अखेर कारण झालं स्पष्ट

दोघांनी वृत्त फेटाळले

दरम्यान, आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेवृत्व केलेल्या डेव्हिड वॉर्नर आणि ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू मायकल स्लेटर यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. डेवी (वॉर्नर) आणि मी चांगले मित्र असून आमच्यात वाद होण्याची शक्यताही नाही, असे मायकल स्लेटर यांनी म्हटले आहे. तर असे काहीही झालेला नाही. जोपर्यंत तुम्हाला ठोस पुरावा मिळत नाही, तोपर्यंत काहीही पसरवू नका, असे वॉर्नरने म्हटले आहे.

पंतप्रधानांवर साधला होता निशाणा

दरम्यान, ऑस्ट्रेलियन सरकारने 15 मे पर्यंत बॉर्डर सील केल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडू हिंदुस्थानमध्ये अडकले. त्यामुळे आयपीएलमध्ये क्रिकेट समालोचक म्हणून काम करणाऱ्या मायकल स्लेटर यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यावर निशाणा साधला होता. सरकारने आम्हाला तुरुंगात टाकण्याची आणि दंड भरण्याची शिक्षा होईल असा फर्मान सोडला, हा फर्मान अपमानकारक असल्याचे स्टेलर म्हणाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या