
द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी उत्तर प्रदेश व बिहारमधील हिंदी भाषिकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हिंदी भाषित तामिळनाडूत येऊन रस्ते व शौचालय साफ करण्याचे काम करतात, असे वक्तव्य मारन यांनी केल्याने वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत मारन हे इंग्लिश व हिंदी बोलणाऱ्यांची तुलना करताना दिसत आहेत. ”इंग्लिश बोलणारे आयटी कंपनीत काम करतात. तर उत्तर प्रदेश व बिहारमधील हिंदी भाषिक हे तामिळनाडूत रस्ते व शौचालय साफ करतात”, असे वक्तव्य मारन यांनी केले.



























































