
जगभरातले अनेक लोक मृत पावलेल्या लोकांना पाहिल्याचा, त्यांच्याशी बोलल्याचा दावा करतात. अनेक लोक त्यांना एका विशिष्ट प्रक्रियेच्या माध्यमातून बोलवल्याचं सांगतात. पण, एका दिवंगत पत्नीने आपल्या नवऱ्याला डेटिंग अॅपवर मेसेज केल्याचा दावा करण्यात येत आहे.
या माणसाने आपली मृत पत्नी आपल्याशी डेटिंग अॅपवरून बोलत असल्याचा दावा केला आहे. डेरेक असं या माणसाचं नाव आहे. तो लंडनचा रहिवासी आहे. डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, डेरेक याची पत्नी एलिसन हिचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं आहे. ती सर्वायकल कॅन्सरने ग्रस्त होती. पण एक दिवस मला टिंडरवर तिची प्रोफाईल दिसली. एका फोटोत ती हसून माझ्याकडे पाहत होती. त्या प्रोफाईलमध्ये अन्य कोणतीही माहिती दिलेली नव्हती. त्या प्रोफाईलवर तिचे असे फोटो होते, जे मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते.
डेरेकच्या म्हणण्यानुसार, त्याला एक मेसेज आला. त्यावर तिने लिहिलं होतं की, तू घरी आहेस का, मी घराबाहेरच उभी आहे. मला आत येऊ दे. वास्तविक त्याने हे फेक प्रोफाईल असल्याचं समजून त्या प्रोफाईलला कनेक्ट करणं बंद केलं होतं. तरीही हा मेसेज आल्यामुळे तो घाबरला होता. त्यानंतर त्याने घराचा मुख्य दरवाजा बंद झाल्याचा आवाज ऐकला आणि थरकाप उडाल्यामुळे अंथरुणात जाऊन झोपला. त्यानंतरही तिने त्याला मेसेज करून टिंडर अॅपवर लवकर आल्याचं विचारलं. त्यात तिने त्याचा उल्लेख डेरी असाही केला होता. त्यामुळे तो आणखी घाबरला.
त्यानंतर डेरेकने तिची माफी मागितली. आपण दोन वर्षं तुझ्या दुःखात काढली असून आता यापुढे मला आयुष्यात पुढे जायचं आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझी खूप आठवण येते, असंही तो म्हणाला. त्यानंतर हे आवाज बंद झाले आणि ते प्रोफाईलही डिलीट झाल्याचं डेरेकचं म्हणणं आहे.
























































