
गॅस सिलिंडरच्या ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत एका आठवडय़ाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना 23 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी करता येईल. याआधी 16 ऑगस्ट अखेरची तारीख देण्यात आली होती.
ई-केवायसीला मुदतवाढ देण्यात आली असली तरी सध्या तांत्रिक अडचणींमुळे देशातील कोटय़वधी ग्राहकांना सर्व्हर डाऊन आणि अॅप बंद पडल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच अनेक गॅस एजन्सीवर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. ग्राहकांना सबसिडी दरात सिलिंडरचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी आधार-आधारित बायोमेट्रिक ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई-केवायसी न केल्यास गॅस सिलिंडरवरील सवलत मिळणार नाही.



























































