हातचलाखी करून करायचे फसवणूक  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँकेत नोटा मोजून देतो असे सांगून हातचलाखी करून पैसे काढणाऱया दोन ठगांना वर्सोवा पोलिसांनी अटक केली. विशाल राजवर आणि मुस्ताक शेख अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.  

तक्रारदार हे वर्सोवा येथे राहत असून ते हेल्परचे काम करतात. मे महिन्यात ते वर्सोवा येथील एका बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. तेव्हा बँकेत दोनजण उभे होते. तक्रारदार याना पैसे भरण्याची स्लिप भरता येत नव्हती. तेव्हा एक जण त्यांच्याकडे आला. त्याने आमच्याकडे 500 रुपयांच्या 1 लाख 80 हजार रुपयांच्या नोटा आहेत. त्या नोटांऐवजी 2 हजार रुपयांच्या नोटा आहेत. त्या नोटा घेऊन बँकेत येतो अशा त्याने भूलथापा मारल्या. त्यावर विश्वास ठेऊन त्याने पैसे दिले.  ठगाने एक रुमाल त्याना दिला. काही अंतर गेल्यावर त्याने तो रुमाल उघडला. त्या रुमालात पैशाऐवजी कागदाचे बंडल होते.