
बॉलिवूडचे सर्वात हॉट कपल म्हणून दीपिका पदुकोण आणि रणवीस सिंह यांच्याकडे पाहिले जाते. दोघेही सध्याच्या घडीचे इंटस्ट्रीतील टॉपचे कलाकार आहेत. दोघांचेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतात. चित्रपटासह दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. नुकतेच दीपिकाने आपला एक असा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यावर रणवीरने सर्वांनाच हैराण करणारी कमेंट केली आहे.
दीपिकाने इन्स्टाग्रामवर शॉर्ट हेअरमधील एक फोटो पोस्ट केला आहे. चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. या फोटोला दीपिकाने ‘ताडा..’ असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो पाहून रणवीरही स्वत:ला रोखू शकला नाही आणि ‘मार दो मुझे…’ अशी कमेंट त्याने केली आहे.

रणवीरसह बॉलिवूड कलाकार आलिया भट्ट, आयुषमान खुराना यांनी देखील दीपिकाच्या या नव्या लूकवर कमेंट केली आहे. आलियाने ‘ओएमजी सुंदर..!’ अशी कमेंट केली आहे, तर आयुषमानने हर्टवाला इमोजी पोस्ट केला आहे.































































