
इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट उघडून युवतीची बदनामी करणाऱयाला खार पोलिसांनी अटक केली. हितेश अमृतलाल मकवाना असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार गृहिणी असून वांद्रे परिसरात राहतात. त्याच्या मुलीचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. त्यावर ते फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. एप्रिल महिन्यात तक्रारदार याना एका अकाऊंटवरून एक अश्लील व्हिडीओ आला होता. तो व्हिडीओ पाहून तक्रारदार याना धक्काच बसला. याप्रकरणी महिलेने खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. पोलिसांनी तपास करून तांत्रिक तपास करून ते अकाऊंट तयार करण्याची माहिती काढली. त्यानंतर पोलिसांनी हितेशला खार परिसरातून ताब्यात घेतले. त्याने ते तक्रारदाराच्या मुलीच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केले होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. नेमके कशासाठी त्याने ते बनावट अकाऊंट तयार केले होते याचा तपास खार पोलीस करत आहेत.



























































