
रेमंड कंपनीचे माजी अध्यक्ष विजयपथ सिंघानिया यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली अवमान याचिका रेमंड कंपनीने अखेर आज मागे घेतली. याप्रकरणी पंपनी ठाणे सत्र न्यायालयात दाद मागणार आहे.
विजयपथ सिंघानिया यांच्या ‘अॅन इनकम्प्लिट लाइफ’ या आत्मचरित्रात रेमंड कंपनीबद्दल बदनामीकारक माहिती नमूद कsली आहे. यावरून त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया आणि ‘रेमंड’ पंपनीसोबत कायदेशीर वाद सुरू आहे. सिंघानिया यांनी कंपनीच्या परवानगाशिवाय आत्मचरित्रात पंपनीची विविध गुपिते उघड केली आहेत. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात रेमंडने अवमान याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. रेमंडच्या वतीने अॅड. अतुल राजाध्यक्ष यांनी याचिका मागे घेत असल्याचे न्यायालयाला सांगितले. प्रकाशक पान मॅक मिलन पब्लिशिंग इंडियाच्या वतीने अॅड. सिद्धेश भोळे यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने विजयपथ सिंघानिया यांच्या आत्मचरित्राच्या विक्री, प्रसार आणि वितरणावर बंदी घालणारा एकल खंडपीठाचा आदेश द्विसदस्यीय खंडपीठाने रद्द करत रेमंड पंपनीने पुन्हा एकल न्यायमूर्ती पीठासमोर याप्रकरणी दाद मागावी असे आदेश दिले होते.

























































