
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मंगळवारी काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी एकत्र येत एक व्हिडीओ प्रसिद्ध करत भाजपने नोटाबंदीदरम्यान 40 टक्के कमीशन घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. विरोधकांच्या या आरोपांवर बुधवारी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्रचारासाठी काँग्रेसने ‘षड्यंत्र’ हा पर्याय निवडल्याचा आरोप संरक्षणमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
पत्रकार परिषदेमध्ये संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, काँग्रेसने मंगळवारी एक स्टिंग ऑपरेशन दाखवत TNN World वेबसाईटद्वारे एक खुलासा केला. ही तिच वेबसाईट आहे जिने लंडनमध्ये ईव्हीएमबाबत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी हजेरी लावली होती. येथे ईव्हीएम हॅक होत असल्याचे दाखवण्यात आले, परंतु नंतर हा दावा चूकीचा असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे असे वाटतेयी की काँग्रेसने यंदा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी ‘षड्यंत्र’ हा पर्याय निवडला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, TNN World वेबसाईटची चौकशी केली असता याची नोंदणी अवघ्या एक वर्षापूर्वी केली असल्याचे उघडकीस आले आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी ही वेबसाईट सुरू केली असून निवडणुकीनंतर ती बंद देखील होऊ शकते, असा आरोपही संरक्षणमंत्र्यांनी लगावला. काँग्रेस ‘षड्यंत्र’ वापरून प्रचार करू इच्छित आहे. जाहीरनामा, स्थानिक मुद्दे आणि सत्य-असत्यबाबत काँग्रेसने मौन बाळगले आहे. काँग्रेसकडे कोणताही मुद्दा नसल्याने त्यांनी प्रचारासाठी ‘षड्यंत्र’ रचल्याचेही त्या म्हणाल्या.
N Sitharaman: Director of this website is a Romanian. Exposure on demonetisation y’day was showed on this website only. This website is registered for only a year. Maybe Congress has planned to close it after elections. Congress has adopted a conspiracy-driven election campaign pic.twitter.com/SqjEctY7Pf
— ANI (@ANI) March 27, 2019
काँग्रेसच्या या षड्यंत्रामध्ये गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार सारखे बडे नेते देखील सहभागी झाले आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. काँग्रेससोबत कोणीही आघाडी करत नसल्याने षड्यंत्राच्या मतदीने काँग्रेस राजकारण करत आहे. परंतु प्रसारमाध्यमांनी काँग्रेसचे खोटे स्टिंग उघड केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते असेही त्या यावेळी म्हणाल्या. तसेच या प्रकरणी भाजप कायदेपंडितांच्या संपर्कात असून पक्षाला बदनाम केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.
Defence Minister Nirmala Sitharaman: I would like to state here, BJP is taking legal advice. We’re taking every possible advice so that institutions & individuals who are part of this conspiracy to defame BJP, we will take them to the court. We will take action on them legally pic.twitter.com/eTzA0bWzA1
— ANI (@ANI) March 27, 2019
























































