नेत्रवारी

73

संजीवनी धुरी-जाधव, [email protected]

संत तुकारामांचे वंशज स्वप्नील मोरे या तरुणाने सुरू केलेल्या व्हर्च्युअल दिंडीत कोटय़वधी नेटकरी सहभागी झाले आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीला जाता न येणाऱया भक्तांसाठी पंढरीची वारी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवायला मिळणार आहे.

स्वप्नील मोरे हा तरुण देहूत राहतो. तुकाराम महाराजांचा हा अकरावा वंशज असल्याने त्याच्या घरी  सगळेच वारीला जातात. असाच एकदा ‘पंढरीचा वारकरी… वारी चुको न दे हरी’ हे ऐकले आणि याएका लाईनवरुन हा उपक्रम त्याला सुचला. शाळा, महाविद्यालयामध्ये असताना त्याला वारीमध्ये जायची प्रचंड इच्छा असायची. पण त्यावेळी ते शक्य व्हायचे नाही. डिग्रीची परिक्षा दिली होती आणि सुट्टी होती त्याच दरम्यान वारी होती. त्यामुळे वारीला जाण्याचा त्याने निर्धार केला आणि त्याच्या मित्रांनाही विचारले, पण नोकरीमुळे त्यांना येता येत नव्हतं. त्यावेळी त्यांची ही खंत कशी भरून काढायची असा विचार केला आणि ‘व्हर्च्युअल दिंडी’ची त्याला कल्पना सुचली. त्याच्या पेजवर त्याने फेसबुक ‘व्हर्च्युअल दिंडी’ नावाचा इव्हेंट बनवला. त्यामध्ये देहूहून निघालेल्या तुकाराम महाराजांची पालखी पंढरपुरात पोहोचपर्यंतच्या प्रत्येक घटनेचे फोटो, व्हिडिओ आणि माहिती या फेसबुकवर द्यायला त्यांनी सुरुवात केली. त्यासाठी फेसबुककरांची दिंडी – व्हर्च्युअल दिंडी असा तो इव्हेंट  केला. फेसबुक दिंडी इव्हेंट जॉईन करण्यासाठी https://www.facebook.com/events/1732023463555955  या लिंक वर क्लिक करावे.

यंदा नेत्रवारी

फेसबुक दिंडी यावर्षी व्यंकटेश परिवार, संभाजीनगर या अंध बांधवांसाठी काम करणाऱया सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ‘नेत्रवारी’ हा अभिनव उपक्रम घेऊन येत आहोत. आतापर्यंत वारी दाखवली ती केवळ डोळस लोकांना, पण आपल्या समाजातील अंध लोकांनाही ही वारी पहाता यावी यासाठी नेत्रवारी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनाही वारी अनुभवता येईल जेव्हा समाजात नेत्रदान होईल. त्यासाठी नेत्रदान करुन अंधांना डोळस बनवूया असे आवाहन केले आहे. आतापर्यंत आठशे ते नवशे लोकांनी नेत्रदानासाठी अर्ज भरले आहेत.(https:/play.google.com/store/apps/details?id=in.infinityits.fbd) वरुन फेसबुक दिंडीचे अॅप डाऊनलोड करुन नेत्रदानाचा अर्ज भरु शकता.

रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी

फेसबुक व्हर्च्युअल दिंडी या उपक्रमाचे यंदा आठवे वर्ष असल्याने फेसबुक दिंडी वारीवरती एक थिम गाणे बनवलेय. आमच्या आठ वर्षाच्या प्रवासावर गाण्याचे  बोल आहेत. त्यात सात वर्षाचे फुटेज वापरुन नुकतेच गाणे लॅन्च यामध्ये आदर्श शिंदे यांनी त्याला आवाज दिला आहे.तर केदार दिवेकर यांनी संगीत संयोजन, पुण्यातील माझे दोन मित्र हर्ष, विजय यांनी संगीत दिले आहे. तारा आराध्य यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. ‘रमलो संसारात खरा.. ऐक रखमाईच्या वरा’ हे गाण्याचे बोल आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या