
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
दिल्लीत काँग्रेसबरोबर कोणत्याही परिस्थितीत आघाडी करणार नाही तसेच आपला कोणताही उमेदवार अर्ज मागे घेणार नाही, असे आम आदमी पक्षाने आज स्पष्ट केले. दिल्लीतून आपचे सात उमेदवार लोकसभा निवडणूक लढवणार असून आप पक्ष काँग्रेसबरोबर आघाडी करणार असल्याची केवळ अफवा आहे, असे आपचे नेते गोपाळ राय यांनी सांगितले. 2 मार्चला आपने 6 तर रविवारी सातव्या उमेदवाराची घोषणा केली.
आप आणि काँग्रेसमध्ये मोठय़ा प्रमाणात धुसफुस असूनही आम्ही काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील होतो. मात्र, काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. आता बस झाले. आम्ही काँग्रेसबरोबर आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही गोपाळ राय यांनी सांगितले.
























































