
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 184 उमेदवारांच्या यादीत भाजपने 5 मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. भाजपने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या मोठय़ा राज्यांतून मुस्लिमांना उमेदवारी देण्याचे टाळले असून त्याऐवजी जम्मू-कश्मीरसारख्या मुस्लिमबहुल भागांतील 5 मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे.
























































