अश्विनला ‘ती’ ओव्हर न देणे दिल्लीला पडले महागात

आयपीएलमध्ये गुरुवारी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या हातातोंडाशी आलेला घास राजस्थान रॉयल्सने हिसकावून घेतला. सुरुवातीला झालेल्या उत्तम गोलंदाजीनंतर शेवटच्या षटकांमध्ये केलेल्या चुकांमुळे दिल्लीला हा सामना गमावावा लागला.

हिंदुस्थानचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला या सामन्यात त्याचे उर्वरीत एक षटक न देणे ही दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वात मोठी चूक ठरली, अशी खंत दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंगने व्यक्त केली. खराब सुरुवात झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीला 148 धावांपर्यंत मजल मारता आली.

त्यानंतर मैदानामध्ये उतरलेल्या राजस्थान रॉयल्सचा निम्मा संघ अवघ्या 42 धावांमध्ये तंबूत परतला होता. सामन्यावर दिल्लीची मजबूत पकड असताना डेव्हिड मिलरने ठोकलेले अर्धशतक आणि ख्रिस मॉरिसच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने हा सामना खिशात घातला.

आपली प्रतिक्रिया द्या