अहमदाबादेत काँग्रेसची आज बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
priyanka-gandhi-new-photo

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देशभरात काँग्रेस कार्यकारिणीच्या जोरबैठका सुरू झाल्या आहेत. काँग्रेस गुजरातच्या अहमदाबादमधून निवडणूक लढणार असून त्यासाठी मंगळवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार असल्याचे पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारकाच्या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. गुजरातच्या भावनगरमध्ये 1961ला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यानंतर म्हणजे तब्बल 58 वर्षांनंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक गुजरातच्या अहमदाबादमध्ये होणार आहे. या बैठकीत अहमदाबादमध्ये निवडणूक लढण्याबाबतची रणनीती ठरवण्यात येणार आहे. दरम्यान, राजकारणात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी प्रथमच यावेळी जाहीर भाषण करणार असल्याचे सांगण्यात येतेय.यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत.