बाप – लेकाने घरात छापल्या 10 कोटींच्या बनावट नोटा, पोलिसांनी अटक करण्याआधीच केली विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बनावट नोटा छापून गैरव्यवहार केल्याच्या घटना अनेकदा उघडकीस येतात. या नोटा खरेदी करणाऱ्या लोकांना मात्र यामुळे नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. बऱ्याचदा सर्वसामान्यांना खोट्या आणि खऱ्या नोटांमधील फरक कळत नाही. त्यामुळे खोट्या नोटा चालवण्याऱ्या गुन्हेगारांना त्यांचा हेतू सहज साध्य करता येतो. न्यूयॉर्कशायमध्येही अशाच एका प्रकरणात पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे.

मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, न्यूयॉर्कशायरमधील बँक स्ट्रीट परिसरात राहणाऱ्या ख्रिस्तोफर गौंट या व्यक्तिने आपला मुलगा जॉर्जन याची मदत घेऊन घरातच 10 कोटी रुपयांच्या बनावट नोटांची छपाई केली. या नोटा त्या व्यक्तिने अंडरवर्ल्डला विकल्या. त्यानंतर जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले तेव्हा तपासानंतर पोलिसांनी या व्यक्तिला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा बराच तपास करण्यात आला.

बनावट नोटांचा वापर नॅशनल क्राईम एजन्सीने नोंदवला आणि आरोपीच्या घरावर छापा टाकला असता घटनास्थळावरून 2 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आणि त्या बनवण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले, तर त्याच्या दुसऱ्या मालमत्तेवर, याशिवाय डाय प्रिंटर, बनावट नोटाही सापडल्या असून आणखी काही उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

ब्रिटनच्या न्यायालयानेही या दोघांना शिक्षा सुनावली. बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेले आरोपी वडील ख्रिस्तोफर गौंट याला न्यायालयाने 6 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर मुलगा जॉर्डनला 2 वर्षांची निलंबित शिक्षा सुनावण्यात आली.

न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बनावट नोटांच्या व्यवसायात गुंतलेल्या पिता-पुत्रांच्या कारनाम्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली की, त्यांनी बनावट नोटा कशा छापल्या आणि नंतर त्या अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना विकल्या. या बनावट नोटा चलनात आल्यानंतर वेस्ट यॉर्कशायर पोलीस आणि नॅशनल काउंटरफेट करन्सी एजन्सीने सुमारे दोन वर्षे तपास केला आणि त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा केला.