धक्कादायक! पाणी समजून अॅसिड प्यायल्याने तरुणीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘अति घाई संकटात नेई’ या म्हणीप्रमाणे दिल्लीत एक घटना घडली आहे. दिल्लीतल्या ब्रम्हपुरी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने घाईघाईत पाणी समजून चक्क अॅसिड प्यायले. पुष्पा (18) असे या तरुणीचे नाव आहे. अॅसिड प्यायल्याचे लक्षात येताच तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पुष्पा तिच्या कुटुंबीयांसोबत ब्रम्हपुरीत राहत होती. पुष्पाच्या खोलीत टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आणलेले अॅसिड ठेवले होते. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुष्पा बाहेरून घरी आल्यावर तिने घाईतच पाणी समजून अॅसिडची बाटली तोंडाला लावली. पुष्पाने अॅसिड प्यायल्याचे कळताच तिच्या घरच्यांनी तिला लगेच जीटीबी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. दरम्यान, शवविच्छेदनानंतर पुष्पाचा मृतदेह पोलिसांनी तिच्या नातेवाईकांकडे दिला. मात्र पुष्पा अनावधानाने अॅसिड प्यायली की, जाणूनबुजून अॅसिड प्यायली याबाबत पोलीस तपास करत आहेत.