आयकर परतावा भरणाऱयांची संख्या घटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

आयकर रिटर्न फाईल करणाऱयांची संख्या एक टक्क्याने घटली आहे. नोटाबंदीनंतर रिटर्न फाईल करणारे वाढतील असा समज होता. मात्र ही संख्या घटल्याचे कोटक इकोनॉमिकल रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांची आकडेवारी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील आकडेवारीपेक्षा 1 टक्क्याने कमी झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत आयकर रिटर्न फाइल करणाऱयांची संख्या 6 कोटी 74 लाख एवढी होती. मात्र या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत ही संख्या 6 कोटी 68 लाख इतकीच आहे. ही आकडेवारी आयकर खात्याच्या वेबसाईटवरच देण्यात आली आहे.