मेट्रोत करत होती हेअर स्ट्रेटनिंग, व्हायरल व्हिडीओवर युजर्स देत आहेत प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली मेट्रोतील विचित्र घटनांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आधी बिकीनी घालून मेट्रो गर्ल, नंतर मेट्रोत आंघोळ करणारा तरुण, अश्लील नृत्य करणारी तरुणी, अशा धक्कादायक घटना होत असताना आता दिल्ली मेट्रोतील आणखी व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक तरुणी मेट्रोत प्रवास करताना हेअर स्ट्रेटनिंग करताना दिसली. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये मेट्रो ट्रेनच्या डब्यात एक तरुणी हेअर स्ट्रेटनरने केस सरळ करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरंतर मेट्रोमध्ये मोबाईल चार्ज आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स चार्ज करण्यासाठी सॉकेट दिले गेले आहेत. मात्र त्याचा वापर तरुणी हेअर स्ट्रेटनिंगसाठी वापरताना दिसत आहे .या व्हिडीओमधील तरुणीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तिला आजुबाजुला लोकं आहेत याची अजिबात काळजी नव्हती. तिचा हा व्हिडीओ शेअर करत,’ दिल्ली मेट्रोची गोष्टच वेगळी आहे’ अशी कॅप्शन देत व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओतील तरुणीच्या वागण्यावर बहुतांश ट्विटर युजर्सनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एका युजरने लिहिले, “दिल्ली मेट्रोचे प्रवासी नियंत्रणाबाहेर जात आहेत. असे दिसते की पालक आणि शाळा दोघेही मूलभूत गोष्टी आणि सार्वजनिक शिष्टाचार शिकवण्यात अपयशी ठरले आहेत.” दुसर्‍या युजरने लिहिले, “मेट्रो अत्याचार… मला वाटते घरी वेळ नाही.”

मात्र, त्यातील एका युजरची प्रतिक्रिया लक्षवेधक ठरली आहे. युजर मुलीने मुलीबद्दल सहानुभूती व्यक्त करत म्हटले की, ‘आधीच्या तुलनेतील व्हिडीओपेक्षा ती खूपच चांगली आहे. आम्हाला तिचे वैयक्तिक आयुष्य माहित नाही, ती व्यस्त असू शकते, कदाचित ती तयार होत असताना तिच्या घरात वीज नव्हती म्हणून ती सर्जनशील झाली. ही एक चांगली कल्पना आहे.”