‘लष्कर’चा दहशतवादी जेरबंद; बांगलादेशातून सुरू होत्या कारवाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लष्कर-ए-तोयबाशी संबंधित एका दहशतवाद्याच्या दिल्लीजवळच्या गाझीपूर येथून सुरक्षा दलांनी मुसक्या आवळल्या. शब्बीर अहमद लोन असे त्याचे नाव असून तो बांगलादेशातून हिंदुस्थानविरोधी कारवाया करत होता. देशातील काही प्रमुख शहरांमध्ये तो तरुणांना दहशतवादी संघटनेत भरती करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

सुरक्षा दल शब्बीरवर दोन महिन्यांपासून पाळत ठेवून होते. 7 फेब्रुवारी रोजी दिल्लीत ‘फ्री कश्मीर’ या पोस्टरवरून या नेटवर्कचा तपास लागला. हे मॉडय़ुल शब्बीरच्या इशाऱयावर चालत होते. त्याची पाच दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

आयएसआयचे नियंत्रण

शब्बीर अहमदचे नेटवर्क पाकिस्तानची गुप्तचर संस्थाआयएसआयच्या इशाऱयावर काम करत होते. दिल्ली, कोलकाता आणि तामीळनाडू या शहरांमध्ये तरुणांना दहशतवादी संघटनेत भरती करण्याची त्याची तयारी होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.