न्यूजक्लिकचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिनी कंपनीकडून आर्थिक रसद मिळत असल्याचा आरोप करण्यात आलेल्या न्यूजक्लिक या वृत्तसंस्थेचे संस्थापक, पत्रकार प्रबीर पुरकायस्थ यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दहशतवाद विरोधी कायद्याअतंर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. या वृत्तसंस्थेचे एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना देखील अटक करण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्यात न्यूजक्लिकचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांच्या घरावर अंमलवजाबवणी संचलनालय अर्थात ईडीने जप्ती आणली होती.