
प्रदूषण टाळण्यासाठी दिल्लीत फटाकेबंदी लागू करण्यात आली होती. पण त्याचा काहीच फायदा झालेला नसून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले आहेत. त्याचा परिणाम दिल्लीत प्रदूषण वाढले असून राजधानीतील हवा विषारी झाली आहे. दिल्लीतील वातावरण गंभीर स्थितीत पोहोचल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
Delhi: Poor visibility in the national capital due to a rise in air pollutants; visuals from Civil Lines and ISBT areas. pic.twitter.com/klUOyCz1zB
— ANI (@ANI) November 15, 2020
गेल्या काही दिवसांत दिल्लीत सातत्याने प्रदूषण वाढत आहे. आता दिवाळीत नागरिकांनी फटाके फोडल्याने त्यात अजून भर पडली आहे. शनिवारी रात्री दिल्लीतील अनेक भागात हवेच्या गुणवत्तेवर प्रभाव पडला असून नागरिकांनी जोरदार आतिषबाजी केली आहे.
दिवाळीच्या सायंकाळी नागरिकांनी फटाके फोडल्याने दिल्लीती हवेच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम झाला आहे. दिल्लीतील अनेक भागात एअर क्वालिटी इंडेक्स 999 वर पोहोचला आहे. संपूर्ण रात्रभर दिल्लीवर फटाक्यांमुळे निर्माण झालेल्या प्रदुषणाची चादर पसरली होती.
#WATCH I Delhi: Smog shrouds parts of the national capital leading to decreased visibility; visuals from Geeta colony pic.twitter.com/MHmmMqX0L7
— ANI (@ANI) November 15, 2020
प्रदुषण कमी कराण्यासाठी उत्तर दिली महानगरपालिकेने अर्थ्या रात्री पाणी शिंपडले. इतकेच नाही तर महापौर जयप्रकाश अनेक भागात फॉगिंग मशीन घेऊन प्रदुषण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. पहाटे चार पर्यंत हवेची गुणवत्ता खूपच खालावली होती.
दिल्ली सरकारने नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांवर बंदी घातली होती. असे असले तरी बहुतांश नगरिकानी राज्य सरकारची बंदी धाब्यावर बसवत जोरदार आतिषबाजी केली आहे. अक्षरधाम मंदिरात दिवाळी पुजनापूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. तसेच यामुळे कोरोना रुग्णांच्या समस्या वाढू शकतात असेही केजरीवाल यांनी बजावले होते.


























































