
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढविणार की विधानसभा निवडणूक लढविणार याविषयीच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम देत मंगळवारी काँग्रेस हायकमांडने पृथ्वीराज यांच्यासह 52 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे दुसरे चिरंजीव धीरज यांना लातूर ग्रामीणमधून संधी देण्यात आली आहे. विलासरावांचे थोरले चिरंजीव अमित यांना यापूर्वीच काँग्रेसने लातूर शहर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
घराणेशाहीची परंपरा कायम ठेवत काँग्रेसने दुसऱया यादीतही अनेक राजकीय घराण्यांच्या वारसांनाच निवडणूक रिंगणात उतरवले आहे. पृथ्वीराज यांचे लोकसभा की विधानसभा असे तळ्यात मळयात सुरू होते. पोटनिवडणुकीत उदयनराजेंविरोधात पराभूत झाल्यास राजकीय करीअरच संपून जाईल, या भीतीने पृथ्वीराज यांनी लोकसभा पोटनिवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शवली होती. काँग्रेसने त्यांना दक्षिण कराडमधून निवडणूक रिंगणात उतरवले असले तरी भाजपाचे अतुल भोसले यांचे कडवे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.
काँग्रेसचे उमेदवार -धुळे ग्रामीण- कुणाल पाटील, मलकापूर- राजू एकाडे, चिखली- राहुल बोंद्रे, जळगाव जामोद- स्वाती संदीप वाकेकर, अकोट- संजय बोडके, अकोला पूर्व- विवेक पारसकर, वाशिम (राखीव)- रजनी राठोड, अचलपूर- अनिरुद्ध देशमुख, वर्धा- शेखर शेंडे, उमरेड (राखीव)- राजू पारवे, नागपूर दक्षिण- गिरीश पांडव, नागपूर पश्चिम- विकास ठाकरे, आमगाव (राखीव)- सहसाराम कारोटे, आरमोरी (राखीव)- आनंदराव गेडाम, गडचिरोली (राखीव)- चंदा नितीन कोडावते, राजुरा- सुभाष धोटे, बल्लारपूर- विश्वास झाडे, वणी- वामनराव कासावार, राळेगाव- वसंत पुरके, आर्णी (राखीव)- शिवाजीराव मोघे, उमरखेड (राखीव)- विजय खडसे, हिंगोली- भाऊराव पाटील, परतूर सुरेशकुमार जेथेलिया, जालना- कैलाश गोरंटयाल, मालेगाव बाह्य- तुषार शेवाळे, चांदवड- शिरीष कोतवाल, इगतपुरी (राखीव)- हिरामण खोसकर, भिवंडी पश्चिम- शोएब अश्फकी, कल्याण पश्चिम- कांचन कुलकर्णी, डोंबिवली- राधिका गुप्ते, बोरिवली- कुमार खिल्लारे, दहिसर अरुण सावंत, मुलुंड- गोविंद सिंग, जोगेश्वरी पूर्व- सुनील कुमरे, कांदिवली पूर्व- अजंता यादव, चारकोप- कालू बुधेलिया, गोरेगाव- युवराज मोहिते, अंधेरी पूर्व- जगदीश अमीन, विलेपार्ले- जयंती सिरोया, माहीम- प्रवीण नाईक, शिवडी- उदय फणसेकर, मलबार हिल- हिरा देवासी, उरण- मनीष पाटील, पेण- नंदा म्हात्रे, शिवाजीनगर- दत्तात्रय बहिरट, कसबा पेठ- अरविंद शिंदे, लातूर ग्रामीण- धीरज विलासराव देशमुख, उमरगा (राखीव)- दिलीप भालेराव, कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण, राजापूर- अविनाश लाड, इचलकरंजी- राहुल खंजीरे, सांगली- पृथ्वीराज गुलाबराव पाटील.



























































