‘भाजपने कितीही प्रयत्न केले तरी कोणतेही काम थांबणार नाही’, मनीष सिसोदियांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होत आहे. राऊस एव्हेन्यू कोर्टाने ईडी प्रकरणात मनीष सिसोदियाची न्यायालयीन कोठडी 23 मे पर्यंत वाढवली आहे. कोर्टातून बाहेर आल्यानंतर मनीष सिसोदिया यांना पुन्हा तुरुंगात आणले जात असताना, न्यायालयाच्या आवारात मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना मनीष सिसोदिया यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला.

तेथे उपस्थित काही पत्रकारांनी सिसोदिया यांना दारू घोटाळ्यातील दोन आरोपींना नुकताच जामीन मंजूर झाल्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया विचारली होती. यावर सिसोदिया म्हणाले की, पटपडगंजचे आणि दिल्लीचे काम थांबणार नाही, भाजपवाल्यांनी कितीही प्रयत्न केले तरी कोणतेही काम थांबणार नाही.