
नोटाबंदीच्या नऊ वर्षांनंतर दिल्लीत जुन्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. या नोटांची किंमत 3.60 कोटी रुपये इतकी आहे. नॉर्थ दिल्लीच्या वजीरपूर परिसरातील शालीमार मेट्रो स्टेशनजवळ या नोटा सापडल्या. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. एवढी मोठी रोख रक्कम कशासाठी आणि कोणी आणली, याचा तपास पोलीस करत आहेत. 20 टक्के कमिशन मिळवण्यासाठी या पैशांचा व्यवहार केला जाणार होता, असे पोलिसांनी सांगितले.

























































